Vaishnavi Hagawane Death : हगवणे कुटुंबियाभोवती कारवाईचा फास आवळला, तीन साक्षीदारांच्या जबाबात काय?

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणImage Credit source: गुगल

वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर याप्रकरणात तिची सासू, सासरा, दीर, नवरा, नणंद यांना अटक झाली आहे. तर प्रकरणातील एक आरोपी नीलेश चव्हाण फरार आहे. याप्रकरणात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याने पोलीस यंत्रणा जागची हालली आहे. वैष्णवीचे दोन भाऊ विराज व पृथ्वीराज तसेच एक मैत्रीण असे एकूण तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच स्त्रीधन म्हणून वैष्णवी हीच दिलेली चांदीची भांडी (पाच ताटे ,पाच तांबे ,चार वाट्या, एक करंडा, एक अधिक महिन्यात दिलेले चांदीचे ताट ) जप्त करण्यात आले आहे.

शस्त्र केले जप्त

आरोपी सुशील हगवणे व शशांक हागवणे यांच्याकडे परवाना धारक शस्त्र असल्याने ते दोन्ही शस्त्र जप्त करण्यात आले. त्यामध्ये एक पिष्टल व एक वेबले कंपनीचे रिवॉल्वर आहे. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन इंडेवर गाडी ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात कारवाईचा फास पिंपरी चिंचवड पोलिसांनी फास आवळत चालला आहे. बावधन पोलिसांकडून हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्यूनर आणि एक्टिवा त्याचप्रमाणे आरोपी राजेंद्र हगवणे फरार असताना ज्या वाहनाने त्याने प्रवास केला ती आलिशान इंडेवर, थार वाहने जप्त करण्यात आली आहेत. बावधन पोलीस ठाण्याच्या आवारात तीन चारचाकी तर एक दुचाकी पाहायला मिळत आहे.

बलेनो कार जप्त

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे यांनी वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. 17 मे ला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवल्याने त्याचा मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता त्यादरम्यान याच बलेनो वाहनातून त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होता. ही बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. आणखी किती वाहन आरोपी राजेंद्र हगवणे हा फरार असताना त्यांनी वापरली याचा तपास बावधन पोलीस घेत आहेत

बंडू फाटक यांच्या फार्मवर पोलीस

पिंपरी चिंचवड पोलीस मावळातील पवनानगर इथे असलेल्या बंडू फाटकच्या फार्म हाऊस वर पोहचले आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी मृत्यू प्रकरणात 17 मे ला गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे हा फरार झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे या दिवशी बावधन मधून थेट मावळ मधील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेला होता. ही माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम पवनानगरच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेली होती. मात्र आरोपी राजेंद्र हगवणे हा पोलीस येण्या अगोदरच मावळ मधील पवना नगर मधून फरार झाला होता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)