निलेश चव्हाणचा काळा इतिहास, कारनामे एकून येईल भोवळ
पुण्यातील मुळशी येथील गावातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane Death) हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात चर्चेत असून तिच्या मृत्यूनमतर तब्बल आठवडाभराने तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी त्या दोघांना स्वारगेट येथून बेड्या ठोकल्या. दरम्यान वैष्णवीच्या माहेरच्यांकडून, कस्पटे कुटुंबियांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून निलेश चव्हाण (Nilesh Chavhan) याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 मे रोजी कस्पटे कुटुंबीय हे वैष्णवीच्या मुलाला, त्यांच्या नातवाला ताब्यात घेण्यासाठी कर्वे नगर येथील निलेश चव्हाणच्या निवासस्थानी गेले असता निलेशने त्यांना धमकावलं. पिस्तुलाचा धाक दाखवत घरातून बाहेर घालवलं. धमकी दिल्याप्रकरणी भा.दं.सं. कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत निलेश चव्हाण याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हा दाखल असलेल्या निलेश चव्हाणचे भयानक कारनामे समोर
दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील काळाच आहे, त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची माहिती समोर आली आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल 2019 साली निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना धमकावल्याचा गुन्हाही निलेश चव्हाणवर दाखल झालाय .
निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल, काय केलं कांड ?
– 3 जून 2018 साली निलेश चव्हाणच लग्न झालं .
– जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला, त्यांच्या बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला . तिने निलेशला याबद्दल विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली .
– मात्र पुढच्याच महिन्यात, फेब्रुवारमध्ये निलेशच्या पत्नीला पुन्हा, घरातील एअर कंडिशनलादेखील काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला . त्यावेळीही तिने निलेशला त्याबद्दल विचारल, पण तेव्हाही त्याने काहीच स्षट् न सांगत पुन्हा उडवाउडवीची उत्तर दिली .
– अखेर एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप ओपन केला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं .
– निलेश हा त्याच्या बायकोला बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता .
– तसेच त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीला, निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपाह्र अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले .
– निलेशच्या पत्नीने याबात जाब विचारला असता त्यानं घरातील चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला . एवढंच नव्हे तर त्याने बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले .
– एवढं सगळं झाल्यावर निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई – वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली. पण तिला मदत करायचं दूर राहिलं, सासरच्या लोकांकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला .
– त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला .
– अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला . तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 साली गुन्हा दाखल झाला .
– त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला पण त्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही . अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला .
– निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय तसेच पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय आहे.
– निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा.
– कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत.