लाडके आमदार, नावडते आमदार यापेक्षा…लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. सध्या लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळाली आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त रंगली आहे. लाडक्या बहिणीचे पहिल्या पाच महिन्याचे ७५०० जमा झाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थिगिती मिळाली. निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. निवडणुकीच्या आधी ज्याप्रकारे तात्काळ पैसे दिले गेले. त्याप्रमाणे आता ही योजना तात्काळ सुरु केली पाहिजे आणि १५०० नव्हे तर महायुतीने २१०० प्रमाणे पैसे द्यायला हवेत. त्यात परत आवडती नावडती बहीण न करता ते पैसे सरसकट खात्यात जमा व्हायला पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)