मुंबई: विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेसेनेला दोन, तर भाजप आणि शिंदेसेनेला प्रत्येकी एका जागेवर यश मिळालं आहे. मुंबईतील दोन्ही जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. लोकसभेत ठाकरेंनी मुंबईत तीन जागा जिंकल्या. तर शिंदेसेना, भाजपला प्रत्येकी १ जागा मिळाली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी वर्चस्व राखलं आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेसेनेचे अनिल परब विजयी झाले. त्यांनी किरण शेलारांचा २६ हजार १२ मतांनी पराभव केला. पदवीधर मतदारसंघात परब आणि शेलार यांच्यात थेट लढत झाली. परब यांनी तीनपैकी पहिल्या दोन फेरीतच विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा गाठला. परब यांना ४४ हजार ७४४ मतं मिळाली. तर शेलारांना १८ हजार ७७२ मतं मिळाली.
लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघात चुरशीचा सामना झाला. ठाकरसेनेचे अमोल कीर्तीकर आणि शिंदेसेनेचे रविंद्र वायकर वायव्य मुंबईत आमनेसामने होते. ४ जूनला मतमोजणी झाली. त्यावेळी बराच गोंधळ झाला. गैरप्रकार घडल्याचे आरोप ठाकरेसेनेकडून करण्यात आले. त्याची पुनरावृत्ती होऊन दगाफटका घडू नये याची खबरदारी ठाकरेसेनेकडून घेण्यात आली.
ठाकरेसेनेचे अमोल कीर्तीकर लोकसभेला अवघ्या ४६ मतांनी पराभूत झाले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाकरेसेनेचे नेते आणि पदाधिकारी सतर्क होते. दगाफटका टाळण्यासाठी व्यवस्थित फिल्डींग लावण्यात आली होती. स्वत: अनिल परब, सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंसह अन्य पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर अक्षरश: ठाण मांडून बसले होते.

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनात ठाकरेसेनेच्या अनिल परब यांचं ऍडव्हान्समध्ये अभिनंदन केलं होतं. त्यावेळी पदवीधर निवडणुकीचं मतदान झालं होतं. परब यांच्यासमोर भाजपचा उमेदवार असताना पाटील यांनी परब यांचं ऍडव्हान्समध्ये अभिनंदन केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पाटील आणि परब यांची भेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात झाली. त्यावेळी तिथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.