Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कंबर कसली; पाचसूत्री कार्यक्रमासह आचारसंहितेची तारीखच सांगितली

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्क प्रमुखांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करतानाच पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे. गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. ”निवडणुकांना अवघे ४१ दिवस उरले आहेत, म्हणजेच पुढच्या ४१ दिवसात आचारसंहिता लागेल त्यामुळे कामाला लागा. चांगलं काम करा”, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहे.

भगवा सप्ताहचे आयोजन करा

शिवसेना ठाकरे गटाकडून ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचेही विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगण्यात आले आहे. या भगवा सप्ताहामध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रम, आढावा बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील ४ महिन्यांमध्ये १५ दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्क प्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घेण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपर्क प्रमुखांना केलं आहे.
Uddhav Thackeray : मोदी-शहांची ‘लाडका मित्र’ योजना, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव, धारावीवरुन ठाकरे आक्रमक

संपर्क प्रमुखांना दिलेला पाचसूत्री कार्यक्रम काय?

१. सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी मतदारसंघात दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे.

२. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.

३. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.

सदर मोहिमेअंतर्गत खालील माहिती अपेक्षित आहे.

  • गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे आणि दूरध्वनी
  • गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे?
  • नवीन मतदारांची नोंदणी किती झाली?
  • किती गावांमध्ये शाखा नाही?
  • नसल्यास कधीपर्यंत स्थापन करणार
  • विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी.
  • गटप्रमुखाचे नाव
  • यादी क्रमांक
  • संपर्क क्रमांक