अर्थसंकल्प निवडणुकांच्या तोंडावर गाजर
बोगस अर्थसंकल्प मांडलाय त्यांची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केली. तुमचा आवाज मांडताना सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचा आवाजच दाबला जातोय अशी खंत ठाकरेंनी राज्यातील जनतेसमोर मांडून दाखवली. राज्यसरकारने मांडलेला अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दाखवलेले गाजर आहे या शब्दांत ठाकरेंनी अर्थसंकल्पावर कडाडून टीका केली आहे
उद्धव ठाकरेंकडून राहुल गांधींची पाठराखण
राहुल गांधी यांनी मुळात हिंदुत्वाचा अपमान केला नव्हता मग भाजप चुकीचा ठराव विधानपरिषदेच्या सभागृहात का आणत होती, म्हणून अंबादास दानवे आणि विरोधकांनी विरोध केला त्यात काय चुकले, कोणीही हिंदुत्वाचा अपमान केला नाही, राहुलजी काहीही चुकीचे म्हणाले नाही, त्यांचे संसदेतील भाषण मुद्दयाचे होते, संसदेत काही खासदारांनी जय संविधान बोलण्यावर सुद्धा आक्षेप घेतला यांना संविधानांची पण का इतकी धास्ती असा सवाल ठाकरेंनी विचारला.
विधानपरिषदेच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षकांचे मानले आभार. लढाईत हार जीत होत असते पण हिम्मत हारता कामा नये अशी भूमिका ठाकरेंनी मांडली आहे. विधापरिषदेसाठी आम्ही तीन उमेदवार दिले आहेत काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, सेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील अशी घोषणा ठाकरेंनी केली.