देशात सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते हे जनतेने दाखवून दिलं आहे. त्यासाठी सर्वांचं अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाद झाले तरी एका बोटाने आपण त्यांना रोखू शकतो हे जनतेने जगाला दाखवलं आहे. याचा अभिमान आणि आनंद आहे.
सत्ता स्थापनेचा दावा करायलाच पाहिजे. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यासाठी उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी मी दिल्लीला जाईल. इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधानपदाचा चेहरा ठरणार आहे.
आमची देशातील लोकशाही वाचवण्याची, संविधान वाचवण्याची आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवण्याची पहिली भावना होती. उद्या सर्वांच्या मताने पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्यात येईल.
उंबरठ्यावर असलेलं सरकार उंबरठड्याबाहेर काढण्यासाठी सगळे एकत्र येतील – उद्धव ठाकरे
जुलूम जबरदस्तीला कंटाळलेले आणि चिडलेले अपक्ष आहेत, हे इंडिया आघाडीत एकवटतील आणि पुन्हा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री करतील. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारला भाजपने कमी त्रास दिला नाही, पुन्हा त्रास हवा का हा प्रश्न आहे? एकदा गेलेलं सरकार जे उंबरठ्यावर आहे ते उंबरठड्याबाहेर काढण्यासाठी सगळे जुलूम जबरदस्तीला कंटाळलेले लोक आहेत ते इंडिया आघाडीत येतील. फक्त नरेंद्र मोदी नाही, आम्ही कुठल्या व्यक्तीविरोधात नाही, आम्ही वृत्तीविरोधात. हुकुमशाहीची वृत्ती या देशात चालू द्यायची नाही हे देशाने ठरवलं आहे.
जिथे मोदींच्या सभा तिथे भाजपचा पराभव झाला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींना टोला लगावला. तर, सांगलीत आघाडीचा धर्म पाळला गेला नाही, हे उघड उघड दिसतंय असंही ते म्हणाले. त्याशिवाय, अमोल कीर्तिकरांच्या जागेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे, या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगात चॅलेंज करू, असंही ते म्हणाले.