पण राहुल गांधींनी हिंदुत्त्वाचा अपमान केला असे म्हणत भाजपने लोकसभेत गदारोळ केला. यानंतर देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले, विधानपरिषदेत सुद्धा काल राहुल गांधींच्या निषेधार्थ प्रस्ताव पटलावर मांडण्यात आला होता पण विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विरोध केला आणि परिषदेत गदारोळ झाला. याच बाबीवर बाचाबाची झाली आणि अंबादास दानवेंचे निलंबन सुद्धा करण्यात आले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राहुल गांधी काय चुकीचे बोलले, काय अपमान केला असा सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना विचारला. राहुल गांधी प्रभु शंकराची प्रतिमा दाखवत होते तर त्याला विरोध केला पण पीएम मोदी संसदेत जय श्रीराम बोलतात ते चालते का? संसदेत भाजपाविना कोणी काही बोलले तर गुन्हा आहे का? राहुल गांधी यांनी बरोबर म्हटले की भाजप म्हणजे हिंदूत्त्व नाही तेच मी पण म्हणतोय. हिंदुत्त्वाचा अपमान आम्ही करणार नाही आणि मी आणि राहुल गांधी सुद्धा हिंदुत्त्वाचा अपमान सहन करु शकणार नाही. भाजपाने हिंदुत्त्वाचा फेक नरेटीव्ह बनवला लोकांना मूर्ख बनवण्यासाठी.
लोकसभेत काही जणांनी शपथ घेताना ‘जय संविधान’ असा नारा दिला त्यावर आक्षेप घेतला गेला याचा जाहीर निषेध करतो आणि विधानसभा तसेच विधानपरिषदेत ज्यांनी जय संविधान नाऱ्यावर आपत्ती दर्शवले त्यांचा निषेधार्थ प्रस्ताव मंजूर करुन संसदेत पाठवा असे महाविकास आघाडीच्या आमदारांना सांगितले.