पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून (डिरेक्टोरेट रेव्हेन्यू इंटलिजन्स) दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकॉकहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे विमानतळावर तब्बल दहा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाकडून दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकॉकहून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बँकॉकवरून आलेले दोघे आरोपी आज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा आढळून आला आहे.
चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. त्यानुसार ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून देखील एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आरोपींची चौकशी सुरू
बँकॉकवरून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत तब्बल दहा कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान हा गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.