हायवे हिरोज कँपेनImage Credit source: TV9 bharatvasrh
टीव्ही9 नेटवर्क आणि श्रीराम फायनॅन्सचं ‘Highway Heroes Campaign’ हे महाराष्ट्रातील कळंबोली येथे पोहोचलं. तेथे हायवे हिरोज अर्थात ट्रक ड्रायव्हर्सची साध देण्यासाठी टीव्ही जगतातील अनेक कलाकार आणि नवी मुंबईचे एसीपी ट्रॅफिक, विठ्ठल कुबडेही हजर होते. यावेळी ‘टीव्ही9 नेटवर्क’चे सीजीओ रक्तिम दास, ‘श्रीराम फायनान्स लिमिटेड’चे सीएसआर प्रमुख एस. बालामुरुगन आणि ‘बाल ट्रान्सपोर्ट’चे सीएमडी बाल मलकीत सिंग हे देखील उपस्थित होते.
एसीपी ट्रॅफिक विठ्ठल कुबडे यांनी फीत कापून या कॅम्पेनची सुरूवात केली आणि ट्रक चालकांशी संवाद साधत त्यांच्याशी रस्ता सुरक्षा नियमांबद्दलही चर्चा केली. त्यांनी टीव्ही9 नेटवर्क आणि श्रीराम फायनान्सच्या या उपक्रमाचे कौतुकही केले. यावेळी पंचायत वेब सिरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुनीता राजवार, टीव्ही अभिनेत्री हुनर हाली, पूनम झावर आणि चित्रपट दिग्दर्शक संजय शर्मा यांनीही सहभाग घेतला. ट्रक चालकांच्या व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनीही या कॅम्पेनचे मनापासून कौतुक केलं.
ट्र्क ड्रायव्हर्सना खास सर्टिफिकेट
भारत सरकारच्या स्किल इंडिया कार्यक्रमाद्वारे मान्यता प्राप्त ट्रेनिंग आणि ट्रक ड्रायव्हर्सना ट्रेनिंगनंतर एक खास सर्टिफिकेट देण्यात येत असून त्याची व्हॅल्यू 12 वी (उत्तीर्ण) सर्टिफिकेटच्या योग्यतेची आहे. अवघ्या 3 तासांत पूर्ण होणाऱ्या या ट्रेनिंगमध्ये ट्रक ड्रायव्हर्सना नवी टेक्नॉलॉजी आणि सुरक्षित ड्रायव्हिंगच्या टिप्सही शिकवण्यात येतात. या सर्टिफिकेटच्या मदतीने, कोणत्याही अतिरिक्त प्रशिक्षणाशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण (renewal of driving licence) करता येऊ शकतं.
हायवे हिरोज या कॅम्पेनमध्ये केवळ टेक्निकल प्रशिक्षणच नव्हे तर चालकांच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आरोग्याचीही काळजी घेण्यात आली आहे. या उद्देशाने, हायवे हिरोज मोहीम तीन प्रमुख सत्रांचे आयोजन करण्यात येतं :
योगा सेशन (मानसिक, शारीरिक फिटनेस): Yoga Institute च्या प्रशिक्षित प्रशिक्षकांनी ट्रक योगाचे विशेष आसन शिकवले. ज्यामुळे ताण, थकवा आणि पाठदुखीसारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळतो.
हेल्थ अवेअरनेस & फ्री चेकअप : Piramal Swasthya च्या टीमने ट्रक चालकांना टीबी (क्षयरोग) रोखण्याचे सोपे मार्ग सांगितले. त्याच वेळी, अपोलो हेल्थ केअरने ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि डोळ्यांची तपासणी (मोफत) सुविधा उपलब्ध करून दिली. ज्यामुळे चालकांना त्यांच्या आरोग्याची संपूर्ण स्थिती समजू शकेल.
आर्थिक साक्षरता आणि मनी मॅनेजमेंट : बचत, स्मार्ट गुंतवणूक आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी एनएसईच्या तज्ज्ञांनी सोप्या, व्यावहारिक टिप्स दिल्या. तसेच कमी उत्पन्न असलेल्या ट्रक चालकांना आर्थिक बळकटीसाठी छोटी पावलं कशी उचलायची ते समजावून सांगण्यात आलं.
गुजरातमधील गांधीधामला असेल कॅम्पेनचा पुढील टप्पा
कळंबोलीनंतर, हायवे हिरोज कॅम्पेन हे देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही पोहोचणार आहे. या कॅम्पेनचा पुढचा टप्पा गुजरातमधील गांधीधाम शहरात असून, तिथे 25 आणि 26 एप्रिल रोजी ट्रक चालकांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांचे टेक्निकल स्किल ( तांत्रिक कौशल्)य वाढवण्यासाठी काम केले जाईल. यानंतर हे कॅम्पेन इंदूर, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे पोहोचेल. ही मोहीम म्हणजे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आपल्या Highway Hero नां… त्या नायकांना सलाम करण्याचा प्रयत्न आहे.