प्रसूतीनंतरचे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर आणि खास काळ असतो. या काळात स्त्रीच्या आयुष्यात आणि शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान प्रत्येक स्त्रीला शारीरिक आणि मानसिक त्रासातुन जावे लागते. त्यातील एक समस्या म्हणजे स्ट्रेच मार्क्सच्या खुणा. कारण जेव्हा गर्भाशयात बाळाची वाढ होत असते तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे त्वचेवर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. मात्र हे स्ट्रेच मार्क्स केवळ पोटावरच दिसत नाही तर मांड्या, हातावरच्या वरच्या भागावर तसेच कंबरेभोवतीच्या भागात सुद्धा येतात. यामुळे प्रसूतीनंतर हे स्ट्रेच मार्क्स सहजासहजी जात नाहीत. अशाने महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. पण आता तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही कारण काही घरगुती उपायांनी आणि त्वचेची काळजी घेण्याच्या सवयींमुळे हे स्ट्रेच मार्क्स कमी होऊ शकतात किंवा जवळजवळ नाहीसे होऊ शकतात. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया त्या प्रभावी टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवू शकता.

नारळ तेल आणि कोरफड जेलची कमाल

नारळाचे तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि कोरफड त्वचा हेल्दी ठेवते. नारळाचे तेल आणि कोरफड जेल हे त्वचेवर लावल्यास त्वचेची लवचिकता वाढवतात. यासाठी तुम्हाला कोरफड जेल आणि नारळाचे तेल समान प्रमाणात घेऊन मिक्स करा. दररोज झोपण्यापूर्वी स्ट्रेच मार्क्सवर हे मिश्रण लावा आणि 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

व्हिटॅमिन ई तेल वापरा

व्हिटॅमिन ई त्वचेच्या पेशीं नीट करते आणि नवीन पेशींच्या निर्मितीस मदत करते. तसेच व्हिटॅमिन ई तेलचा वापर तुम्ही स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील करू शकता. व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून त्याचे तेल काढा आणि ते थेट स्ट्रेच मार्क्सवर लावा. आंघोळीनंतर दररोज लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

शिया बटर किंवा कोको बटरने मसाज करा

हे दोन्ही बटर नैसर्गिक मॉइश्चरायझर आहेत आणि त्वचेला खोलवर पोषण देतात. हे त्वचेला मऊ बनवून स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी करतात. तुम्हाला फक्त हे बटर तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर लावायचे आहे.

साखर आणि लिंबूने स्क्रबिंग

लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात आणि साखर त्वचेला एक्सफोलिएट करते, ज्यामुळे मृत त्वचा काढून टाकली जाते आणि त्वचेचा रंग सुधारतो. यासाठी 1 चमचा साखर, 1/2 लिंबाचा रस आणि थोडेसे नारळाचे तेल मिक्स करा. यानंतर, स्ट्रेच मार्क्स वर 2-3 मिनिटे हलके हातानी स्क्रबिंग करा. तुम्हाला हे आठवड्यातून 2-3 वेळा करावे लागेल. काही दिवसात तुम्हाला स्वतःला या घरगुती उपाय केल्याचा फरक दिसेल.

दूध आणि हळदीचा पॅक

हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दूध त्वचेला मॉइश्चरायझ करते. दोन्ही एकत्रितपणे त्वचेची स्थिती सुधारतात, तसेच दुध आणि हळद हे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 1 टीस्पून कच्चे दूध, 1/2 टीस्पून हळद यांची पेस्ट बनवा आणि ती स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. असे काही दिवस केल्याने तुम्हाला स्ट्रेच मार्क्स कमी झाल्याचे लवकरच दिसून येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)