या घटनेची सुरूवात आजपासून १३ वर्षापूर्वी म्हणजे २०११ साळी उत्तराखंडच्या डेहराडून येथून होते. अलीशा (नाव बदलण्यात आले आहे) ची भेट अभय (नाव बदलण्यात आले आहे)शी एका सोशल इव्हेंटमध्ये होते. दोघांचे पहिल्या भेटीत एकमेकांवर प्रेम जडते. अलीशा एक व्हिज्युअर इफेक्ट्स आर्टिस्ट तर अभय एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत पायलट होता. दोघे पुढील आठ वर्ष एकमेकांना भेटत राहतात आणि अखेर २०१९ मध्ये लग्न करतात. अलीशा-अभय लग्नानंतर काही काळ कोलकाता येथे राहतात आणि मग मुंबईत शिफ्ट होतात.
मुंबईत सुरु झाला ‘डर्टी गेम’
अलीशाला मुंबईत एका फिल्म कंपनीत काम मिळाले. काही काळा दोघांच्या सर्व काही ठीक सुरू होते. पण गोष्टी अचानक बदलू लागल्या. अभय पार्टीसाठी अनेकदा मित्रांना घरी बोलवायचा.या पार्टीत Truth or Dare गेम खेळला जाई. या गेममध्ये अभय अलीशाकडून मित्रांसमोर अश्लील गोष्टी करण्यास सांगायचा. Truth or Dare गेममध्ये जेव्हा जेव्हा बाटलीचे तोंड अलीशाच्या दिशाला येत असे तेव्हा तेव्हा अभय डेअरच्या नावाखाली मित्रांच्या समोर तिला कपडे काढण्यास सांगत. सुरुवातीला अलीशाला ही गोष्ट तो चेष्टेत करतोय असे वाटले. पण जेव्हा अभयने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली तेव्हा अलीशाला त्याचा खरा चेहरा दिसला.
अलीशाने मित्रांसमोर कपडे काढण्यात नकार दिल्यावर अभयने मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर पाच वर्ष अलीशा या गोष्टी सहन करत होती. काही वर्ष मुंबईत राहिल्यानंतर दोघे गुजरातला शिफ्ट झाले. गुजरातला गेल्यानंतर देखील अभयकडून मारहाण आणि अन्य प्रकार सुरूच होते. अखरेर अलीशाच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि तिने गुजरातमधील अडाजल पोलिसांकडे तक्रार केली.
अलीशाने तक्रारीत अभयवर घरगुती हिंसाचाचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करतील अशी तिला आशा आहे. या प्रकरणी अडालज पोलिस ठाण्याचे केबी शंखला यांनी सांगितले की, आम्ही गुन्हा नोंद करून घेतला आहे आणि लवकरच कारवाई करू.