१. कोणत्या लोकल रद्द? वाचा टाइमटेबल
ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
२. मुंबईकरांसाठी गुड न्यूज!
मरिन ड्राइव्ह ते वरळी मुंबई सागरी किनारा प्रकल्पाचे तीन टप्पे सुरू झाल्यानंतरही, या मार्गावरून बेस्ट बस सेवा सुरू होऊ शकली नव्हती. अखेर शुक्रवार, १२ जुलैपासून बेस्ट उपक्रमाने सिंगल डेकर एसी बस चालवण्यास सुरुवात केली आहे. एनसीपीए (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक पश्चिम या दरम्यान मुंबई सागरी किनारा मार्गे असा बेस्टच्या या एसी बसचा मार्ग असेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
३. बाबा, ओळखलंत का? आपल्या जोशी सरांची नात
द्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडला. नववधू आणि नवरदेवाला आशीर्वाद देण्यासाठी देशविदेशातील पाहुणे मंडळी हजर होती. फक्त चित्रपट कलाकारच नाही, तर राजकारण, क्रीडा, उद्योग विश्वातील दिग्गज मंडळीही या समारंभाला उपस्थित होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची या लग्नात एका अनपेक्षित पाहुणीशी भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे.
४. नाना पटोलेंनी फुटीर आमदार ओळखले
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार मैदानात उतरल्याने या निवडणुकीत फाटाफूट ही निश्चितच होती. भाजपकडून पाच, शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन असे नऊ उमेदवार महायुतीकडून उभे राहिले; तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडून एक, शिवसेना उबाठाकडून एक आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एक असे तीन उमेदवार रिंगणात उतरले. ११ जागांसाठी १२ उमेदवार असल्याने आता कोण कोणाला पाडणार, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अधिक बातमी वाचा सविस्तर…
५. आयएएस पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट
प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. काल पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांचा जमिनीसाठी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यात आता मोठी बातमी समोर आली असून दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…
६. नाशकात भीषण अपघात; चौघांचा अंत
नाशिकमध्ये आडगावजवळ आयशर ट्रक आणि मारुती ब्रेझा या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात नवीन सिडको परिसरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आयशरचालक विरुद्ध दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ब्रेझा कारने समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
७. आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’
सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या काळात ज्यांनी अमानुष वेदना सहन केल्या, त्यांच्या ‘अमूल्य योगदानाचे’ स्मरण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जाहीर केले.
८. राधिका मर्चेंटचे मनमोहक लुक, पारंपारिक टचने जिंकले मन
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे विधी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या विधींमध्ये हे जोडपे अतिशय सुंदर शैलीत दिसत आहे. 12 जुलै रोजी राधिका अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. हळदी आणि शिवपूजनाच्या विधीपूर्वी अंबानी कुटुंबाने गरबा रात्रीचे आयोजनही केले होते. अधिक बातमी वाचा सविस्तर…
९. चैतन्य नंतर साक्षीचा आणखी एक नवा बॉयफ्रेंड!
ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन सायलीवर रागावून बोलतो आणि म्हणतो की, तू आमच्या घरासाठी योग्य सून नाहीयेस. तुला घरी यायचं असेल तर ये नाहीतर खड्ड्यात जा. असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन सायलीवर रागावलेला बघून प्रियाला खूप आनंद होतो. सायली पण तिथून निघते. अर्जुन आणि सायली एकत्र घरी जातात, तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो तुम्हाला माझी ऍक्टिंग कशी वाटली? सायली अर्जुनवर रुसलेली असते. अर्जुन, सायलीला का रागावलात म्हणून विचारतो. दुसरीकडे महीपत आणि साक्षी कोर्टात सिद्ध करण्यासाठी साक्षीच्या खोट्या बॉयफ्रेंडचा प्लॅन करत असतात.
१०. ज्योती याराजीचा खडतर प्रवास जाणून घ्या…
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नीरज चोप्रासह अनेक भारतीय खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत त्यापैकी एक म्हणजे भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ज्योती याराजी तर तिच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.