१. शिवसेनेची जास्त जागांची बेगमी?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नकारात्मक वातावरण असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी दोन हात केले. राज्यातील थेट लढतींमधील तेरापैकी सात जागा कशा व किती फरकाने जिंकल्या, याची आकडेवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या गुप्त भेटीत सादर केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला जास्तीत जास्त जागा लढवायला कशा मिळतील, याची बेगमीच या भेटीच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे कळते. अधिक बातमी वाचा सविस्तर…
२. लोकसभेत ताकद दाखवली, आता शिंदेसेनेची मोठी मागणी
लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या शिंदेसेनेनं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व्हेच्या नावाखाली आमच्या अनेक जागांवर दावे सांगण्यात आले, जागावाटपास उशीर करण्यात आला, उमेदवार बदलण्यात आले, असं म्हणत शिंदेसेनेच्या नेत्यांनी तक्रारीचा सूर आळवला. त्यातच राज्यात भाजपला केवळ ९ जागा जिंकता आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पॉवर वाढली आहे.
३. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या बुधवारी (दि. २६) मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक लढविणाऱ्या २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. प्रत्येक शिक्षक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
४. ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर जलसंकट!
पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन धरणांमधून राखीव कोट्यातील जलसाठ्यातून पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा वाढवण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नवीन धरण आणि सांडपाण्यावर तीन स्तरावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर हे प्रकल्प हाती घेतले. मात्र, ते अद्याप पूर्णत्वास जाऊ शकलेले नाहीत.
५. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत दिली. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली. अधिक बातमी वाचा सविस्तर…
६. ‘वारी’ने जागवला खाकीतील ‘भक्तिरस’
पळसेतील मुक्काम संपवून सोमवारी पहाटे सिन्नरकडे प्रस्थान करणारी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी… या सोहळ्यात विठुनामाच्या गजरात दंग झालेले वारकरी… त्यांच्याभोवती बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हाती लाठीऐवजी टाळ अन् मृदुंगाची दोरी… या भक्तिमय वातावरणात कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांनीही विठुनामाचा जयघोष करीत ‘वारी’त सहभागी होत पालखीला नमन करून पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ केले.
७. दारू तस्करीसाठी तरुणांची अनोखी शक्कल
अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा काही नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे. कधी चारचाकी वाहनात वेल्डिंगने कप्पे तयार करून, कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून, तर कधी पार्सल सामानातून दारूची तस्करी केली जात आहे. एका तरुणाने मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी नवीनच जुगाड केला आहे. त्या तरुणाचा हा नवीन जुगाड पाहून पोलिसही चक्रावले आहेत. अधिक बातमी वाचा सविस्तर…
८. सावनीच्या नाकावरच टिचून सागरने मुक्तासाठी आणला महागडा ड्रेस
प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सावनी तिच्या लग्नाची अनाउन्समेंट करताना जो ड्रेस घालायचा आहे तो तिला नापसंत पडल्यामुळे घरात तांडव करत असते. जी मुलगी ड्रेस घेऊन आली तिला नको नको ते सुनावत असते. सावनी फक्त चांगलेच ड्रेस घालते. मी द सावनी आहे. जिच्या उठा बसता साड्या सुद्धा डिझायनर असतात आणि तू मला असे फालतू ड्रेस घालायला देतेस. मी तुझं करिअर बरबाद करेन असं खूप काही तिला बोलते ज्यामुळे ती मुलगी रडू लागते. तेव्हा मुक्ताची आई आणि मुक्ता त्या मुलीला आधार देतात. मुक्ता सावनी शी बोलते की हा ड्रेस खरच खूप छान आहे. तुमच्यावर तो छान दिसेल.
९. ऑस्ट्रेलिया गाठणार सेमी फायनल फेरी
टी-२० वर्ल्ड कप मधील सर्वात रोमांचक सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात बोसेजु स्टेडियमवर रंगला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु सपशेल अपयशी ठरताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २०६ चे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले परंतु लक्ष्य प्राप्त करताना ऑस्ट्रेलिया संघ २० षटकात ७ बळी गमावून केवळ १८१ इतकीच धावसंख्या उभारू शकले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक मारासमोर कांगारू संघ गडगडले आणि विजयासोबतच भारताने सेमी फायनल फेरी सहज गाठली.
१०. धमाकेदार IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला
व्हिस्की, रम, ब्रँडी, जिम व्होडका इत्यांदींचे ऑफिसर्स चॉईससह अनेक प्रसिद्ध मद्य ब्रँड उत्पादक कंपनी अलाईड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्सचा आयपीओ (प्रायमरी इश्यू) आजपासून सबस्क्रिप्शनसाठी ओपन होत आहे. महाराष्ट्र-स्थित या कंपनीच्या आयपीओमध्ये नवीन इश्यू तसेच ऑफर फॉर सेल (OFS) शेअर्सचा समावेश असेल. अलाईड ब्लेंडर्स आणि डिस्टिलर्स कर्जाची परतफेड करण्यासाठी आयपीओमधून ७२० कोटी रुपये वापरतील तर उर्वरित पैसे सामान्य कॉर्पोरेट उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरले जातील.