उद्धव ठाकरे कडाडलेImage Credit source: गुगल
मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात ऐरणीवर आला आहे. सक्तीच्या हिंदीविरोधात उद्धव ठाकरे आणि मनसे आक्रमक झाली आहे. या मुद्दावर दोन्ही पक्षांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षात मनोमिलनाची चर्चा नेतृत्वानेच सुरू केली आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत मराठीच चालणार असे सांगितले.
मराठी सक्तीची करा
तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदू कसे? तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करता मग मराठी कसं असं विचारलं जातं. अरे आमचं हिंदुत्व अस्सल धर्म पाळणारे, मराठी भाषा पाळणारे हिंदुत्वादी आहोत. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
फडणवीस यांना सांगतो, तुमचे खाली आले होते ना जोशी का माशी. ते तिथे बोलले तिथे आधी मराठी सक्तीची करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी आलंच पाहिजे. मग आम्ही हिंदीचं काय करायचं ते पाहून घेतो. पण मुंबई में मराठी येण्याच पाहिजे असं क्या नही. तुमको मराठी आलंच… अशी ही माणसं ज्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यादेखत होतोय आणि आम्ही तो बघत बसायचं. सांगा ना, घाटकोपरची भाषा मराठी आहे. तिथे मराठी सक्तीची करा, अशी जोरकस मागणी त्यांनी केली.
प्रत्येक माणूस तिथे मराठी बोललाच पाहिजे. जी लोकं मराठीचा दुस्वास करतात. आम्ही कुणाचा दुस्वास करत नाही. आमच्याकडे येतात बोलतात. शिवसैनिक आहेत. उत्तर भारतीय आहेत. मुस्लिम आहेत. आम्ही एकीकडे हे धोरण घेतोय. तुम्ही काड्या का घालता? असा सवाल त्यांनी केला. तामिळनाडूत स्टॅलिन बसलाय. तिकडे बोलून तर दाखवा. आमचं हिंदीचं वैर नाही. सर्व बोलतात. तुम्ही सक्ती का करताय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
राज्याच्या शैक्षणिक धोरणावर टीका
नरसिंह रावांना १४ भाषा यायच्या. उत्तम मराठी बोलायचे. कुठे सक्ती होती. माझे वडील आणि प्रबोधनकार यांनी ७वीत शाळा सोडली. पण शिकायचं असेल तर कसाही शिकतो. फडणवीस तुम्ही जे काही गडबड घेतलेत त्यांना हिंदी काय मराठी सक्तीचं करा. त्यांना मराठी कसं बोलायचं ते शिकवा, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
तुमचे सहकारी सुशिक्षित आहे का. मी वाद करत नाही. पण ते कॅपेबल आहे का. केवळ गद्दारीची सर्टिफिकेट घेऊन त्यांना पदं दिलीत का. किती वेळा पक्ष बदलला. वा… ये डबल ग्रॅज्युएट आहे ये माझ्याकडे. ही अशी लोकं राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.