भाज्या आणि फळे हे दोन्ही आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असल्याने आपण त्यांचे नियमित सेवन करत असतो. तसेच निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर या दोन्ही गोष्टींचा तुमच्या आहारात समान प्रमाणात समावेश नक्की करा. आपण बहुतेक भाज्या सोलून बनवल्या जातात आणि फळांच्या बाबतीतही तेच असते. पण काही लोकं असे असतात ज्यांना काही फळं सालीसह खायला आवडतात.
त्यात आपण अनेकदा जेवण बनवताना बटाटे-कांदा यांचा वापर करत असतो. त्यानंतर कांदे- बटाटे व इतर फळांची सालं आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की या सालीचा वापर तुम्ही काही प्रमाणात करू शकता. जर तुम्ही या साली थेट कचऱ्यात फेकत असाल तर पुढच्या वेळी असे करणे थांबवा. कारण आम्ही तुम्हाला फळं आणि भाज्यांच्या सालीच्या योग्य वापराबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला खूप फायद्याचे ठरणार आहे.
बटाट्याची साल डोळ्यांचा थकवा दूर करते
आपल्या जेवणात बटाटे जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये वापरले जातात. त्यानंतर बटाट्याची साल आपण फेकून देतो. पण बटाटाच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन आणि एंझाइम्ससमृद्ध डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुजलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांना आराम देण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यासाठी तुम्हाला बटाटाच्या साली १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ते डोळ्यांभोवती लावून ठेवा. १५ मिनिटांनी तोंड धुवून घ्या. अश्याने तुमच्या डोळ्यांना खूप आराम मिळेल तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. अशाने पुढच्या वेळेस बटाट्याची साल फेकून न देता असा वापर करा.
संत्र्याची साल दातांना स्वच्छ करते
चमकदार दातांसाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का तुम्ही जी फळं खात आहेत त्यांच्या सालीच्या मदतीने तुम्ही तुमचे दात चमकवू शकतात. दात चमकदार करण्यासाठी केळी किंवा संत्र्याची साल खूप फायदेशीर आहे. त्यांच्या सालीचा आतील भाग दातांवर चोळावा. यामुळे दातांचा पिवळसरपणा दूर होईल. कारण संत्र्याच्या आणि केळीच्या सालींमध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि पोटॅशियम असते, जे दात इनेमलसाठी चांगले असतात.
तसेच संत्र्याच्या सालीचा वापर हा घरात येणाऱ्या कीटकनाशकांना दूर करण्यासाठी देखील केला जातो. कारण संत्री आणि लिंबूमध्ये आढळणारा वास कीटकांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. तुपामुळे तुमच्या घरात ज्या ठिकाणी कीटक दिसल्यास तेथे संत्र्याची साली ठेऊन द्या.
सफरचंदाच्या सालीने त्वचा चमकेल
आज काळ आपण प्रत्येकजण सफरचंदाची सोलून खात असतो. पण या सफरचंदाच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले कोलेजन त्वचेला तरुण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तुम्ही जर सफरचंदाची साल चेहऱ्यावर लावल्यास मुरुम-पिंपल्सची समस्याही दूर होईल.