LIC Bima Sakhi Yojana: महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, विविध प्रकारचे उपक्रमही तुम्ही पाहिले असतील. आता अशीच एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. या योजनेचं नाव LIC ची विमा सखी योजना, असं आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या दरम्यान त्यांना काही पैसेही मिळणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा हा प्रयत्न 18 ते 70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे.
LIC ची विमा सखी योजना आज 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ होईल. आज दुपारी दोन वाजता पानिपत येथून विमा सखी योजनेचा शुभारंभ करतील. LIC च्या विशेष योजनेच्या शुभारंभाच्या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रही प्रदान करतील. पीआयबीने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
18 ते 70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांसाठी योजना
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) हा प्रयत्न 18 ते 70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सुशिक्षित महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये आर्थिक समज आणि विम्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील.
LIC मध्ये विमा एजंट बनण्याची संधी
तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या मॅट्रिक उत्तीर्ण महिलांना LIC मध्ये विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे. याशिवाय बॅचलर पास इन्शुरन्स सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे.
योजनेतून कोणाला मिळणार लाभ?
18 ते 70 वयोगटातील सुशिक्षित महिला
दहावी उत्तीर्ण महिलांना 3 वर्षांचे प्रशिक्षण देणार
प्रशिक्षणादरम्यान पैसे मिळतील
प्रशिक्षण झालेल्यांना LIC एजंट होण्याची संधी
बॅचलर पास विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी
LIC ची विमा सखी योजना सुशिक्षित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उद्देश त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा आहे. या योजनेअंतर्गत दहावीच्या महिलांना आर्थिक समज विकसित करण्यासाठी आणि विम्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वयंरोजगारासाठी सुरू करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा हा प्रयत्न 18 ते 70 वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे.