सापासारखा दिसणारा ‘हा’ मासा आहे प्रचंड चविष्ट, औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध, कमी वजन कमी करण्याासून ते…

रिबन मासा हा एक वेगळा पद्धतीचा मासा आहे. ज्याच्या लांब आणि पातळ शरीरामुळे तो सापासारखा दिसतो. हा मासा उष्णकटिबंधीय समुद्रामध्ये आढळतो आणि त्याच्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगासाठी तसेच औषधी गुणधर्मांसाठी तो ओळखला जातो. तरुणांसाठी हा मासा सुपर फूड बनवू शकतो. जाणून घेऊया या माशाबद्दल.

जेव्हा रिबन मासा बार्बलेस असतो तेव्हा त्याला स्वॉर्डफिश म्हणतात तर ज्याला काटे असतील तर त्याला खडू स्वॉर्डफिश म्हणतात. खोल समुद्रात पकडल्या जाणाऱ्या रिबन मासा काळा रंगाचा असतो तर किनारी भागात आढळणारा मासा हा राखाडी रंगाचा असतो. हा मासा सुमारे 100 सेंटीमीटर लांब आणि दहा किलो वजनाचा असू शकतो. मात्र मच्छीमारांना एक ते पाच किलो वजनाचे मासे मिळतात.

कुठे मिळतो हा मासा?

रिबन माशांना उष्णकटिबंधीय भागात राहणे आवडते. भारतामध्ये प्रामुख्याने हे मासे श्रीलंकेच्या आणि तामिळनाडूच्या जवळपासच्या समुद्रांमध्ये सापडतात. त्यांच्या आहारात लहान मासे आणि कोळंबी यांचा समावेश होतो. रात्रीच्या वेळी हे मासे समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन कोळंबीची शिकार करतात आणि मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात.

रिबन माशाची चव सामान्य माशांपेक्षा चांगली आहे असे सांगितल्या जाते. तामिळनाडूतून विविध जिल्ह्यांमध्ये त्याची निर्यात केली जाते. हंगामामध्ये हा मासा 250 ते 350 रुपये किलो दराने विकला जातो. विशेष म्हणजे त्याचा गरुवड नावाचा वाळलेला प्रकार ताज्या माशा पेक्षा अधिक जास्त स्वादिष्ट लागतो. तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे की, गरुवडाची चव ताज्या माशांपेक्षाही चांगली लागते.

रिबन माशात असलेले औषधे गुणधर्म

  • ओमेगा 3 फॅटी ॲसिड: या माशात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
  • प्रथिने आणि सोडियम: उच्च प्रथिने आणि सोडियम फिटनेस किंवा वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या तरुणांसाठी उत्तम पर्याय बनवतात.
  • व्हिटॅमिन बी 12: हे जीवनसत्व हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच नैराश्य टाळण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील मदत करते.
  • सांधेदुखीवर आराम: खालचा पाय आणि सांधेदुखी बरे करण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

कसे करायचे रिबन माशयाचे सेवन?

  • रिबन मासा अनेक प्रकारे खाता येऊ शकतो.
  • फिश करी
  • ग्रिल्ड फिश
  • गरुवड
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)