आयुर्वेदामध्ये शिलाजीतच्या सेवनाचे अनेक फायदे सांगितले आहेत. शिलाजीतच्या सेवनामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहातं, असं मानलं जातं.
दुसरीकडे जंगलामध्ये अशी देखील एक वनस्पती आढळते. जी शिलाजीतपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. या वनस्पतीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत.
या जंगलांमध्ये आढळणाऱ्या वनस्पतीचं नाव आहे, अश्वगंधा. आयुर्वेद शास्त्रामध्ये अश्वगंधाचे अनेक फायदे सांगितले आहेत.
अश्वगंधा ही एक अशी वनस्पती आहे, जिचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्रामध्ये करण्यात येत आहे. अश्वगंधाला शिलाजीतपेक्षाही अधिक शक्तिशाली मानलं जातं.
अश्वगंधाचं उत्पादन हे विथानिया सोन्मीफेरा नावाच्या एका छोट्या वृक्षापासून घेतलं जातं. अश्वगंधा ही जंगलात आढळणारी आणि दुर्मिळ वनस्पती असल्यामुळे ती महाग असते.
अश्वगंधाचं उत्पादन आशियामधील काही देशांमध्ये तसेच आफ्रिका आणि युरोप खंडांमध्ये घेतलं जातं.
ही अशी वनस्पती आहे, की तुम्ही तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शिलाजीतचं सेवन करतात, मात्र त्याऐवजी जर अश्वगंधाचं सेवन केलं तर तुम्हाला डबल फायदा होतो. तसेच रिझर्ल्ट देखील लवकर मिळतो. (टीप ही माहिती उपलब्ध माहितीवरून देण्यात आली आहे, यातील कोणत्याही तथ्याबाबत टीव्ही 9 दावा करत नाही, कोणत्याही औषध, वनस्पती यांचं सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)