या’ लोकांनी चुकूनही पिऊ नये लेमन टी, आरोग्यास ठरू शकतो हानिकारक

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आपण तंदुरस्त राहण्यासाठी घरगुती उपायांसह हेल्दी आहार घेत असतो. अशातच काहीजण त्यांचे आरोग्य फिट राहावे यासाठी त्यांच्या आहारात दुधाच्या चहापेक्षा लेमन टी पिणे पसंत करतात. कारण लेमन टी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर मानला जातो. विशेषतः जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लिंबाचा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात. कारण लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. कोणत्याही ऋतूत तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी, तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पिऊ शकता, असे केल्याने तुम्ही दिवसभर सक्रिय राहू शकता. त्याचबरोबर लेमन टी प्यायल्याने काही लोकांना शरीरिक नुकसान देखील होऊ शकते. लेमन टी कोणत्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो ते आपण आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊयात…

आंबट पदार्थांची ॲलर्जी

ज्या लोकांना आंबट पदार्थांचे सेवन केल्याने ॲलर्जीची समस्या उद्भवते त्या लोकांनी लेमन टी अजिबात पिऊ नये. तुम्ही जर लेमन टीमध्ये मध किंवा इतर गोष्टी मिक्स करत असाल तर त्यामुळे गंभीर ॲलर्जी होऊ शकते. हे प्यायल्याने शरीरावर खाज सुटणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या सर्वांव्यतिरिक्त, तोंड आणि घशात सूज येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अ‍ॅसिडिटीची समस्या

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीची समस्या आहे त्यांनीही लेमन टी पिऊ नये. गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स या आजारामध्ये (GERD), लेमन टी प्यायल्याने तुमच्या पोटातील आम्ल वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, लेमन टी पिणे नक्कीच टाळा.

मायग्रेनचे रुग्ण

लेमन टीमध्ये टायरामाइन हे अमिनो आम्ल असते. ज्यामुळे मायग्रेनच्या रुग्णाला समस्या निर्माण होऊ शकतात. मायग्रेनच्या रुग्णांनी लेमन टी पिल्यास मायग्रेनचा झटका येऊ शकतो. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.

दात पोकळी

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. कारण यात सायट्रिकचे प्रमाण आहे, म्हणून जर तुम्ही ते जास्त वापरले तर तुमच्या दातांच्या मुलामा गंभीर नुकसान होईल. त्यासोबतच दातांच्या पोकळीची समस्या उद्भवू शकते. याशिवाय दातांमध्ये आंबटपणा आणि वेदनांची समस्येचा त्रास होईल. जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर लेमन टी पिऊ नका.

तुम्ही या आजारांसाठी औषध घेत असाल तर लेमन टी पिऊ नका

जर तुम्ही उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मायग्रेन सारख्या कोणत्याही आजारासाठी नियमित औषध घेत असाल तर तुम्ही लेमन टी पिऊ नये कारण त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)