सध्या सगळी कडे ऑनलाईन पद्धतीने कपड्यांपासून ते अगदी स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तु, पदार्थ मागवले जातात. त्यात आपल्याला काही फळे आणि भाज्या ऑनलाइन किंवा स्थानिक दुकानांमध्ये दिसतात जी आपल्या देशात सामान्यतः आढळत किंवा त्यांचे पीक घेतले जात नाहीत. तर अशी फळे आणि भाज्या या परदेशातुन आपल्या देशात आयात केले जातात. विदेशी फळे आणि भाज्या आहेत ज्यांचे उत्पादन इतरत्र देशातील असतात. परंतु आता जगातील इतर देशांमध्येही मोठ्या आवडीने ही विदेशी फळे आणि भाज्यांचे सेवन केले जातात. चला तुम्हाला अशाच काही अनोख्या दिसणाऱ्या फळे आणि भाज्यांबद्दल जाणून घेऊयात…
ड्रॅगन फ्रूट
बाहेरून गुलाबी दिसणारे हे फळ आतून पांढरे आणि गुलाबी दोन्ही रंगाचे असते. जरी हे फळ आता भारतात सामान्य झाले असले तरी ते मूळचे दक्षिण मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. याला पितया असेही म्हणतात. त्याची चव थोडी कलिंगड सारखी किंवा किवीसारखी लागते. या फळात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते .
पॅशन फ्रूट
सुगंधित आणि जांभळ्या-लाल रंगाचे, पॅशन फ्रूट दक्षिण अमेरिकेतून येते. त्याची चव पेरूसारखी आहे. यातील एका फळातून फक्त 17.5 कॅलरीज मिळतात. तसेच या फळातुन मुबलक प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर देखील प्रदान होते. तर हे पॅशन फ्रूटचे काप करा आणि चमच्याच्या मदतीने त्याच्या बिया आणि पल्प खा. तुम्ही त्याच्या बिया काढून रस किंवा सॉस देखील बनवू शकता.
रोमेनेस्को
या फळाला काही ठिकाणी रोमेनेस्को कॉलीफ्लावर असेही म्हणतात. या भाजीचा आकार खूपच वेगळा आहे आणि तो पहिल्यांदा रोममध्ये पिकवला गेला. शिजवल्यानंतर त्याची चव शेंगदाण्यासारखी लागते. तुम्ही ते भाजी आणि सॅलड म्हणून खाऊ शकता. त्यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फायबर असतात.
बोक चॉय
ही चिनी पांढऱ्या कोबीची एक जात आहे, जी केल, ब्रुसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली सारखच आहे. हे प्रामुख्याने चीनमध्ये उत्पादित केले जाते, परंतु ही भाजी जगभरात खाल्ली जाते. तर ही भाजी तुम्ही शिजवून खा किंवा कच्ची, त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
मँगोस्टीन
रसाळ, गोड आणि चवीला किंचित तुरट असलेले हे फळ मूळतः इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये उत्पादित केले जाते. त्याचा रंग गडद जांभळा किंवा लाल असतो. मॅंगोस्टीनमध्ये असे काही घटक असतात जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करतात. हे फळ हिरड्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
रॅम्बुटन
हे फळ लिचीसारखे दिसते, पण त्यावर केसांसारखी पोत आहे. खरं तर, त्याचे नाव मलय शब्द ‘रॅम्बुट’ पासून आले आहे, ज्याचा अर्थ केस आहे. मूळतः मलेशिया, थायलंड, व्हिएतनाममध्ये पिकवले जाणारे हे फळ गोड आणि किंचित आंबट चवीचे आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्तीसाठी चांगले मानले जाते. तसेच या फळांचे आपल्या भारताच्या दक्षिण भागात देखील उत्पादन घेतले जातात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)