काश्मिरातील पांढरे शुभ्र बर्फाच्छादित डोंगर जितके सुंदर तितके येथे उगवणारे केसर आणि ड्राय फ्रुट्स प्रसिद्ध आहे. पर्यटक येथून अक्रोड,बदाम आणि असली केसर (Saffron) विकत घेतातच..एका सिझनला ३ ते ४ लाख रुपयांपर्यंतचा ते व्यवसाय करतात, कश्मिरी वुडन आर्ट, पेपर मेशी आणि लोकल पेंटिंग्स,लाकडी नक्षीकाम खरेदी करतात.
दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरला आपल्या कुटुंबियांसह दाखल होत असतात. येथे आल्यानंतर पर्यटक येथील सौंदर्याचा आनंद तर घेतातच शिवाय येथील बाजारात शॉपिंग देखील करतात.
जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथील बैरसण या भागाला मिनी स्वित्झर्लंडच म्हटले जाते येथील हिरवेकच्च डोंगर निळेशार आकाश आणि पांढरे शुभ्र बर्फाच्छादित डोंगर पाहीले तर अरसिक माणूसही रसिक होईल.
पहलगाममध्ये येथील खाद्यपदार्थांची चव देखील भारी असते. खास करुन नून चाय आणि काश्मिरी राजमा चावल आणि ढाबा आणि फूड स्टॉल्सवरील खादाडी खुप प्रसिद्ध आहे.चांगला फूड स्टॉलधारक दर सिझनला लाखो रुपये कमावतो.
दुकानदार येथील लोकल प्रोडक्ट्स आणि सर्व्हीसेसद्वारे दर सिझनला लाखों रुपये कमावत असतात.पहलगामच्या बाजारात रंगबिरंगी पश्मीना शॉल्स आणि वुलन विक्री करणारे स्टॉल्स दिसतात. या शॉल हाताने विणलेल्या असतात. त्या इतक्या सुंदर असतात की टुरिस्ट त्यांना खरेदी केल्याशिवाय राहूच शकत नाही. या एका शॉलची किंमत १००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत असते
बैसरन खोरे (Baisaran Valley) आणि आजूबाजूच्या ट्रॅकिंग रूट्ससाठी येथे पर्यटक घोडे भाड्याने घेत असतात. एका फेरी मागे तर ५०० ते ३००० रुपयांपर्यंत दररोज कमावत असतात.एका सिझनला व्यापाऱ्याला ५०-६० हजार रुपए प्रति महीना कमाई होते.