पुण्यातील तरुणीचं हॉटेलच्या रुममध्ये होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नाआधीच मोठं कांड, प्रकार उघड झाला अन्…

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील खामगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचं लग्न ठरलं मात्र तिला आपला होणारा नवरा पसंत नव्हता. पण तिने त्याला लग्नाला नकार दिला नाही, लग्नाला नकार देण्याऐवजी तीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी दिली. मेरठमध्ये नुकतीच सौरभ तिवारी या तरुणाच्या हत्याकांडाची घटना समोर आली होती, त्यातच आता ही बातमी समोर आल्यानं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दीड लाखात सुपारी

मयुरी दांडगे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, मयुरीचं लग्न सागर कदम नावच्या तरुणासोबत ठरलं होतं. मात्र मयुरीला सागर पसंद नव्हता. त्यामुळे तीने सागरच्या हत्येची सुपारी दिली. आरोपींनी सागरला एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याच्यावर जीवघेना हल्ला केला. मात्र या हल्ल्यातून सागर थोडक्यात वाचला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. ज्यांनी सागरच्या हत्येची सुपारी घेतली त्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी जीने सुपारी दिली होती ती मयुरी दांडगे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.सागरने पोलिसांना आपल्या जबाबामध्ये म्हटलं आहे की, मयुरीने त्याला आधीच धमकी दिली होती की, जर हे लग्न तुटलं नाही तर तुझी हत्याही होऊ शकते.

मात्र मयुरीने सांगून देखील सागरने लग्न मोडलं नाही, त्यांचं लग्न जमलं त्यानंतर मयुरीने दीड लाखांमध्ये सागरच्या हत्येची सुपारी दिली. सागरला हॉटेलमध्ये बोलून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र सागरचं नशीब चांगलं असल्यामुळे तो या हल्ल्यामधून वाचला आहे.

घटनेनं खळबळ 

या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, होणारा पती पसंत नव्हता म्हणून तीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचीच सुपारी दिली. ही सुपारी दीड लाख रुपयांमध्ये देण्यात आली होती. मात्र सागरचं नशीब चांगलं म्हणून तो या हल्ल्यामधून वाचला आहे. या प्रकरणात आता पोलीस फरार मयुरीचा शोध घेत आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)