पुण्यात भररस्त्यात तरुणाचे अश्लील चाळे, वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले ‘त्याने लघुशंकासिग्नलवर नाही तर माझ्या…’

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज देशभरात सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बालात्कार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांन येरवडा परिसरात रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)