पहलगाममधील दहशदवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात डोंबिवलीतील 3 मावसभावांचा तर पनवेलमधील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी अशी मृत्यू झालेल्या मावसभावांची नावे आहेत. संजय लेले हे आपल्या कुटुंबसोबत डोंबिवलीतील श्री विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तवाला होते. पनवेलमधील दिलीप देसलेंचा देखील हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील अतुल मोने हे त्यांच्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी गेले होते. हल्ल्यात अतुल मोने यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि मुलीबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. हेमंत जोशी देखील त्यांच्या कुटुंबासोबत फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत पत्नी मोनिका आणि मुलगा देखील असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अद्यापही जम्मू – काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती देखील समोर येत आहे. राजा राणी ट्रॅव्हल्सचे 1 हजार पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरुप आहेत. राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमेन अभिजीत पाटील सरकारच्या संपर्कात असून पर्यटक सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यातील जगदाळे कुटुंबातील काही नातेवाईक देखील काश्मीरमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबातील संतोष जगदाळे यांना गोळी लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तर जळगावमधील 16 महिला काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी जळगामधील महिला गेल्या होत्या. नागपुरातील एक कुटुंब पहलगाममध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
पहलगाममधील दहशदवादी हल्ल्याततब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 20 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैय्यबाने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात काश्मीरच्या अनेक पर्यटन स्थळांची रेकी केल्याचे उघडकीस आलं आहे. यात पहलगाम येथील हॉटेल होतं.