भावाला भेटण्यासाठी बहीण निघाली, मात्र काळ आडवा आला अन्…; भावंडांची आयुष्यभराची ताटातूट

Sangli News : सांगलीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या भावाला भेटायला बहीण निघाली होती. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

(फोटो)

सांगली : सांगलीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या भावाला भेटायला बहीण निघाली होती. मात्र रस्ता ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत बहीण गंभीर जखमी झाली, जिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पार्वती सदाशिव माने वय, 58 रा. पोखले ता. पन्हाळा जि. कोल्हापूर असे मृत महिलेचे नाव आहे. ७ मे रोजी रात्री साडे आठच्या सुमारास पार्वती माने या चव्हाण वाडी आष्टा येथील आपल्या भावाला भेटायला चालत निघाल्या होत्या.

आष्टा-सांगली रस्ता ओलांडून त्या आपल्या भावाच्या घराकडे येत असताना स्प्लेन्डर मोटार सायकल क्र. एम.एच.09 डी. जी.7992 याने मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळेने पार्वतींना जोरदार धडक दिली. या अपघातातत्या गंभीर जखमी झाल्या. हे समजताच दुचाकी चालकाने तेथून पळ काढला. भावा-बहिणीची भेट होण्याआधीचे पार्वतींवर काळाने घाला घातला. मृत पार्वती माने यांचे बंधू कृष्णा बाबू जानकर रा.आष्टा यांनी दुचाकीस्वार मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे रा.डांगे कॉलेज शेजारी, आष्टा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Buldhana News: बुलढाण्यात अवकाळी पावसाचा कहर, महिलेवर आकाशातून मृत्यू कोसळला, दोन लेकरांनी डोळ्यापुढे आईचा मृत्यू पाहिला
मोरेश्वर महंकाळे याने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. डोक्याला जोरदार मार लागल्याने पार्वती यांनी सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना पार्वती माने यांचे निधन झाले. भावा-बहिणीची आता आयुष्यभरासाठी ताटातूट झाली आहे. पार्वती माने यांचे बंधू कृष्णा बाबू जानकर (रा. आष्टा) यांनी दुचाकी चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे (रा. डांगे कॉलेज मागे, आष्टा) याच्या विरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आष्टा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अशीच एक दुर्दैवी घटना जळगावातून समोर आली आहे. वडिलांच्या दुध व्यवसायात मदत करणाऱ्या एका अठरा वर्षीय तरुणीचा अपघात झाला. गेल्या दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचाही अपघात झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती. त्यानंतर तिने दुध व्यवसायाची धुरा आपल्या हाती घेतली. नेहमीप्रमाणे भाग्यश्री १२ मे ला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरुन दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि भीषण अपघात घडला. भाग्यश्री खाली पडली, तिच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)