ग्रामीण भागात आता शेतीची काम संपत आली आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने या स्पर्धेचा उत्साह दुणावला आहे. अनेक गावात सध्या बैलगाडा शर्यतीचा थरार दिसून येत आहे.
आता मावळ तालुक्यात भिररररररर्र चा आवाज घुमला, छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
लोणावळ्यातील मळवली गावात छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मळवली मध्ये छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली.
या छकडी बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दीडशे बैलगाडा शौकिनांनी सहभाग घेतला आहे.
तर विजेत्या बैलगाडा मालकाला 5 दुचाकी आणि रोख रक्कम अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याने बैलगाडा मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.