वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टूरिझम फेस्टिव्हल
नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टूरिझम फेस्टिव्हलचा आज अर्थात 15 फेब्रुवारी रोजी दुसरा दिवस आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क Tv9 आणि Red Hat Communication द्वारे हा मेगा महोत्सव आयोजित केला जात आहे. महोत्सवाचा पहिला दिवस खूपच आकर्षक होता, ज्यामध्ये दिल्लीच्या कानाकोपऱ्यातून लोक सहभागी झाले होते.
या फेस्टिव्हलचा दुसरा दिवसही खूप छान अनुभव देणारा ठरणार आहे. दुसऱ्या दिवशी कार्यशाळा, स्पर्धा, पुरस्कार वितरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 14 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा महोत्सव 16 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या फेस्टिव्हलची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे तुम्हाला भारतीय संस्कृतीची माहिती तसेच प्रवास आणि व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती मिळेल. दुसऱ्या दिवसाचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घेऊया.
कसे असेल वेळापत्रक ?
वर्ल्ड ट्रॅव्हल आणि टूरिझम फेस्टिव्हलसाठी कसे कराल तिकीट बूक ?
सर्वप्रथम, तुम्ही अधिकृत रजिस्ट्रेशन पेजवर जावे. रजिस्टर करण्यासाठी तेथे क्लिक करा.
त्यानंतर तुमचं नाव, वय आणि मोबाईल नंबरसह इतर सविस्तर माहिती त्यात भरावी.
त्यानंतर तुम्ही 14, 15 आणि 16 फेब्रुवारीपैकी कोणताही दिवस निवडू शकता किंवा तीनही दिवसांची निवडू शकता.
त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करा.
या गोष्टी असतील खास
दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हल वर्कशॉप्सशिवाय, पाकविषयक चर्चा आणि अनेक एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज असतील.ज्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, तसेच विविध बक्षीसंही जिंकू शिकता. एकूणच या महोत्सवाचा दुसरा दिवस माहितीपर तर असेलच पण मनोरंजकही असेल.