कावळा माणसासारखा बोलायला लागला ! व्हायरल व्हिडीओने नेटकरी हैराण – Video

माणसाची नक्कल करणारे पोपट आपण अनेकदा पाहीले असतील, परंतू कावळा माणसाप्रमाणे बोलताना पाहून नेटकरी हैराण झाले आहेत,हा बोलणारा कावळा सध्या माणसाच्या आवाजाची नक्कल करतो. हा कावळा पालघर येथील गारगांवात हा कावळा रोज येत आहे. येथील एका कुटुंबाचा हा सदस्य झाला आहे. या कुटुंबाच्या सोबत हा कावळा जेवत देखील असतो. आणि काका आले गं, असे काही बाही शब्द ही बोलत असतो..या कावळ्याने सध्या इंटरनेटवर धुमाकुळ घातला आहे.

पालघरच्या वाडा तालुक्यातील गारगावातील बोलणारा कावळा सध्या खुपच व्हायरल झाला आहे. हा कावळा मराठीत काका, बाबा असे शब्द सहज उच्चारत असतो. हाकेला ओ देत असतो. या कावळ्याचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. गारगावातील एका कुटुंबाचा हा मेंबर झाला आहे. या कावळ्याला तीन वर्षांपूर्वी गारगावातील १२ वीची विद्यार्थी तनुजा मुकाने ही एका झाडाखाली जखमी अवस्थेत सापडला होता.त्याला तिने घरी आणले आणि त्याचा सांभाळ केला. आता हा कावळा घरातील सदस्य बनला असून मराठीतून त्यांच्याशी बोलत असतो.

सर्वसाधारणपणे कावळा कधी माणसाळत नाही. तो माणसांपासून दूरच असतो. परंतू हा कावळा या कुटुंबाचा सदस्य झाला आहे. तनुजाला हा कावळा जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला बरे केल्यानंतर तो त्यांच्या कुटुंबाचा सदस्यच झाला. हा कावळा त्यांच्या सोबत जेवण करीत असतो. त्यांच्या अंगा खांद्यावर बसत असतो.

दीड वर्षाचा हा कावळा गेल्या महिन्यापासून अचानक बोलायला लागला आहे. तो मराठी भाषा शिकला असून काका, बरं का, आई, ताई, असे शब्द बोलत असतो. या कावळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कावळा घरात येऊन पाणी आणि जेवण देखील मागतो असे घरातील सदस्य सांगतात. हा कावळा म्हाताऱ्या आजी बाई सारखं खोकूनही दाखवतो.

घराची राखण करतो

या आदिवासी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या कावळ्याला हाक मारली तर ओ देतो आणि त्यांना काका, आई, ताई, बाबा नावाने हाक मारतो. हा कावळा घराची राखण देखील करतो.जर घरात कोणी अनोळखी आले तर हा कावळा त्याला काय करतो असे विचारतो देखील. हा कावळा दिवसभर त्यांच्या अन्य सवंगड्यात राहतो आणि सायंकाळ झाली की घरी पुन्हा येतो या अनोख्या कावळ्याला पाहायला लोक दुरुन दुरुन येत आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)