Sangli Man Died On Road: सांगलीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. या तरुणाची हत्या करण्यात आली आहे असा सर्वांचा समज झाला आणि सांगलीत तशी अफवा पसरली. पण, त्याच्या मृत्यूचं जे कारण समोर आलं त्याने सांगलीकर आणखी घाबरले आहेत.
सांगलीत आयस्क्रीम विकणाऱ्याचा मृत्यू
सांगली शहरात आयस्क्रीम विकणारा परप्रांतीय रामपाल निषाध असं या मृताचं होत आहे. तो आयस्क्रीम विकताना अचानक त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या त्यानंतर काहीच वेळात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाहून परिसरात त्याची हत्या झाल्याची अफवा उठली आणि एकच गोंधळ माजला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेत सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर या विक्रेत्याता मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
रामपाल हे आयस्क्रीम विक्रेते आहेत. ते सांगली मध्ये गेले २० वर्ष वास्तव्यास आहेत. ते आज शहरातून हिराबाग येथे गेले होते. त्यांनी अचानक आयस्क्रीमची गाडी साईडला घेतली आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
सांगतील काल दोन हत्या
सांगलीत काल दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या. चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेचा तिच्या पतीकडूनच खून करण्यात आला होता. तर मिरज या ठिकाणी गॅंगवॉरमधून एका तरुणाचा खून झाला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये खुनाच्या दोन घटना घडल्याने सांगली हादरून गेली होती. अशातच आज एका तरुणाचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला आणि सर्वत्र खून झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. हिराबाग कॉर्नर या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.