मशरूम हे वर्षभर बाजारात उपलब्ध असणारी भाजी आहे. त्यात मशरूम ही अशी एक गोष्ट आहे, ज्याचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होतो आणि त्याने जेवणाची चव चांगलीच वाढते. त्यातच मशरूमचे अनेक प्रकार आहेत हे सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे बाजारात आपल्याला मशरूमचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण सध्या हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील एका दुकानात ठेवण्यात आलेल्या अनोख्या लाल रंगाच्या मशरूमने लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाल रंगाचा एक मोठा मशरूम दिसत आहे. मशरूमचे वजन 5.5 ते 6 किलो आहे. त्याचे वजनच नाही तर त्याची किंमतही तितकीच मोठी आहे.
या अप्रतिम मशरूमचे वजन आणि किंमत ऐकल्यानंतर लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की या मशरूमची किंमत इतकी का आहे? आणि या मशरूममध्ये एवढे खास काय आहे? त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला या मौल्यवान मशरूमबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
रेशी मशरूम म्हणजे काय?
रेशी मशरूमचा वापर पारंपारिक आशियाई औषधांमध्ये 2,000 वर्षांपासून केला जात आहे. त्याला “अमरत्वाचा मशरूम” असेही म्हणतात. हे विशेष मशरूम त्याच्या चमकदार लाल रंगामुळे आणि गुळगुळीत, मेणाच्या पृष्ठभागामुळे वेगळे दिसते. पण त्याची खरी ओळख त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आहे, ज्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ आणि महाग आहे.
रेशी मशरूमचे आरोग्यदायी फायदे
रेशी मशरूममध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, ज्यामध्ये बीटा-ग्लुकन आणि ट्रायटरपेनॉइड्स हे संयुगे समाविष्ट असतात. हे संयुगे या मशरूमला अत्यंत फायदेशीर बनवतात. जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
1. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते- रेशी मशरूम पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करून संरक्षण प्रणाली मजबूत करण्यास मदत करते. हे शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास सक्षम करते.
2. तणाव कमी करते- या मशरूममध्ये ॲडप्टोजेनिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीरातील तणाव कमी करण्यास आणि मानसिक शांतता राखण्यास मदत होते.
3. झोपेची गुणवत्ता सुधारते- रेशी मशरूमचा वापर झोपेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पारंपारिकपणे केला जातो. हे निद्रानाशाची लक्षणे कमी करू शकते आणि झोपेचे चक्र सुधारू शकते.
₹5 Lakh Mushroom Stuns Shoppers at City Store
Spotted at a high-end food store in Banjara Hills, this exquisite Reishi Mushroom, priced at a jaw-dropping ₹5 lakh, is a rare sight. Weighing 5.5-6 kg, its stunning red hue and glossy, wax-like finish make it a true showpiece.… pic.twitter.com/0jsgzoyUmr
— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) January 25, 2025
4. अँटिऑक्सिडंट्स समृद्ध- या मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा, केस आणि एकूणच आरोग्य उत्तम राहते.
5. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर- काही संशोधनानुसार असे समोर आले आहे की, रेशी मशरूम हे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)