देवेंद्र फडणवीस नव्हे तर महिला नेत्याला मुख्यमंत्री करा; ‘त्या’ नेत्याच्या मागणीने भुवया उंचावल्या

देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: ANI

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सत्ता स्थापनेकडे… महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळात कुणा- कुणाचा समावेश असणार? याबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अशातच भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने ही मागणी केली आहे.

ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी ही मागणी केली आहे. ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. मनोज जरांगे पाटीलचा खुटा ओबीसीने उपटला आहे.महायुतीसाठी ओबीसी समाज निर्णायक ठरला आहे. ओबीसी समाज्याला मुख्यमंत्री पद द्यावं, असं ससाणे यांनी म्हटलं.

छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री कराव अशी आम्ही मागणी करतोय महायुतीने याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसेल. आम्हाला वाटत नाही लक्ष्मण हाके यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल… भेटलं तर स्वागत आहे, असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)