CM Devendra Fadnavis First Design: मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी समारंभानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिला कोणता निर्णय घेता? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय पुण्यातील रुग्णासाठी घेतला. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. मंत्रिमंडळाची ही बैठक अर्धा तास चालली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.