वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार – भाजपा नेत्याची जहरी टीका, महायुतीतच कलह

भाजपातून लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि ते लोहा – कंधार मतदारसंघातून निवडून येऊन आमदार झाले. मात्र त्यांच्या कन्या प्रणिता देवरे चिखलीकर या भाजपामध्ये राहिल्या. यावरुन आता प्रताप पाटील- चिखलीकर यांच्याकडुन पराभव झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपात प्रवेश केला आहे. या नेत्याने भाजपात आल्यानंतर चिखलीकर यांना उद्देश्यून वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार ? असा चिमटा काढल्याने महायुतीतच अंतर्गत कलह रंगला आहे.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे शिवसेनेकडून प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात निवडणूक निवडणूक लढवलेल्या एकनाथ पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर एकनाथ पवार यांनी ठाकरे शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आहे. एकनाथ पवार एका  कार्यक्रमात म्हणाले की, वडील राष्ट्रवादीत आणि मुलगी भाजपा विकास कसा होणार अशी टीका केली होती. भाजपा नेत्याच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि कन्या प्रणिता देवरे चिखलीकर यांनी समाचार घेतला आहे.

तुम्ही राष्ट्रवादीत मुलगी भाजपात

कोण काय बोलतो याला मी फारशी किंमत देत नाही. त्यांनी भाजपात काम करावं की राष्ट्रवादी हा त्यांचा विषय आहे. प्रणिता जरूर माझी मुलगी आहे, माझी बहीण (आशा शिंदे यांनी शेकापमधून लोहा विधानसभा लढवली होती ) सुद्धा माझ्या विरोधात होती.भाजपाचं असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपात थोडं फार असेल तर त्यांनी पक्षातून काढायचं काम करावं. कोणी कुत्र विचारत नाहीत, इथं फडफड करण्यापेक्षा ती तक्रार फडणवीस साहेबांकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावे वडील एका पक्षात आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहे. प्रणिता देवरे चिखलीकर या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षात आहेत असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.

भाजपात काम कशाप्रकारे चालतं हे त्यांना माहीत नाही

विधानसभेच्या निवडणुका या महायुतीमध्ये झाल्या आणि यामध्ये चिखलीकर साहेबांचा पारंपारिक लोहा कंधार मतदार संघ भाजपाला सुटला. देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारून चिखलीकर साहेबांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते निवडून आले. जे माझ्यावर टीका करतात ते विधानसभेला भाजपाच्या विरोधात उभे राहिलेले, काही लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम केल ते लोक भाजपात आलेत. त्यांना विचारधारा नाही, भाजपात काम कशाप्रकारे चालतं हे त्यांना माहीत नाही म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करतात.

पक्षाने कायम माझ्यावर विश्वास दाखवला

रावसाहेब दानवे यांचे पुत्र भाजपाचे आमदार आहेत तर कन्या शिवसेनेत आहेत. नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेत आहे एक भाजपाचा मंत्री आहे. खडसे साहेबांच्या सुनबाई भाजपाच्या मंत्री आहेत आणि खडसे साहेब वेगळ्या पक्षात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला स्वतः सांगितलं तू भारतीय जनता पार्टी सोडायची नाही मी तुझ्या पाठीशी पाठीशी आहे. मी माझं काम करते भारतीय जनता पक्षाने कायम माझ्यावर विश्वास दाखवला आहे असेही प्रणिता देवरे – चिखलीकर यांनी म्हटले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)