अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, त्याच भविष्य, आणि व्यक्तिमत्व कसं आहे हे मुलांकावरून ओळखता येतं. हा मुलांक व्यक्तीच्या जन्म तारखेवरून काढला जातो. जन्मतारखेचा अंक आणि त्याची बेरीज यावरून मिळणाऱ्या एका अंकाला अंकशास्त्रात मुलांक म्हणतात, ज्याच्या विश्लेषणातून जीवनाचे असे रहस्य उलगडते. आज आम्ही तुम्हाला अशा मुलांकाच्या मुलींबद्दल सांगणार आहे, जय एक उत्तम पत्नी असतात. आपल्या नवऱ्याची काळजी घेण्यात देखील त्या माहिर असतात. सासरी कायम या मुलांकाच्या मुलींच कौतुक होतं.
जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक १ असेल. या संख्येचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा आदर, तेज आणि कीर्तीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे 1 मुलांक असलेल्या महिला आत्मविश्वासू असतात. या महिला कोणतेही काम करण्यास अजिबात संकोच करत नाहीत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असतात. या महिला अत्यंत आकर्षक असतात आणि त्यांच्या सौंदर्याची पूर्ण काळजी घेणाऱ्या असतात. तसंच स्वत:बरोबर नवऱ्याची देखील काळजजी घेणं त्यांना चांगलच जमतं.
आर्थिक समज : मुलांक 1 च्या महिला कोणतीही वस्तू खरेदी करताना अत्यंत सावध असतात. या महिला कधीच स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तू खरेदी करत नाही. फ्रीज असो, कूलर असो, टीव्ही असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो, त्या नेहमीच चांगल्या आणि टिकाऊ वस्तू खरेदी करतात. अशावेळी या महिला पैसे वाया घालवत आहेत असं वाटत असलं तरी, त्या जे काही खरेदी करतात ते चांगलं आणि टिकाऊ असतं.
प्रेम आणि विवाह : मुलांक 1 च्या महिला क्वचितच प्रेमविवाह करतात. परंतु जर त्या एखाद्यावर प्रेम करत असतील तर ती व्यक्ती शिक्षित, आशादायक आणि उच्च पदावर नोकरी करणारी असते. बहुतेकदा या महिलांचं लग्न अरेंज मॅरेज होते आणि साधारण 24 ते 28 व्या वर्षी या महिला लग्न करतात. त्यांना त्यांच्या सासरच्या घरात जास्त लोकांशी मिसळणे आवडत नाही, म्हणून काही लोक या महिला गर्विष्ठ वाटतात. पण या महिला आपल्या सासरच्या मंडळींची सेवा करण्यात कधीच कसूर करत नाही. आपल्या पतीचा देखील या महिला खूप आदर करतात. तसंच मुलांक 1 च्या महिला कधीच आपल्या जोडीदाराशी, नवऱ्याशी चार लोकांत, सगळ्यांसमोर भांडत नाही.
मुले आणि कुटुंब : या महिलांच्या परिवाराचा विचार केला तर मुळणणक 1 च्या महिलांना सहसा दोन ते तीन मुले असतात. या महिला आपल्या मुलांची, कुटुंबाची आणि पतीची पूर्ण काळजी घेतात. सासरच्यांची सेवा करण्यासही या महिला आनंदाने तयार असतात. त्यामुळे या मुलांकाच्या महिलाना आपल्या सासरी देखील खूप आदर मिळतो.