पुण्यातील वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली, सासरच्या छळाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू , सासरा आणि नंदण यांना अट केली आहे, दरम्यान हे प्रकरण ताज असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात देखील वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याचं कनेक्शन समोर आलं आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळवणुकीला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सुयश चौंधे याच्या पत्नीनं हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणात खडक पोलीस स्टेशनमध्ये आणि महिला आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. पती सुयश चौंधे, दीर संकेत चौंधे, सासरा नरेश चौंधे आणि सासू वैशाली चौंधे यांच्याविरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात आली चार महिन्यांपूर्वी महिला आयोगात तक्रार केली होती, मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा दावा पीडितेकडून करण्यात आला आहे.
सासू काळी जादू करते, लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तोळे सोनं दिलं होतं, मात्र त्यानंतरही वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. वीस लाखांच्या हुंड्याची मागणी करण्यात आली, त्यासाठी आपला छळ करण्यात आला, आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप या प्रकरणातील पीडित सूनेनं केला आहे.
राजेंद्र हगवणे कनेक्शन
विशेष म्हणजे या प्रकरणात देखील राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर आलं आहे. राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा फरार असताना ज्या थार गाडीमधून ते फिरत होते, ती थार गाडी पीडितेचा दीर संकेत चौधे याची होती. त्याच थार गाडीतून हगवणे पितापुत्र फिरत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा याला फरारी असताना मदत करणारा आणि थार गाडी फिरण्यासाठी देणारा संकेत चोंधे याला बावधन पोलीस स्थानकात तपासासाठी आणण्यात आलं असताना या ठिकाणी 20 ते 25 मुलं जमली आहेत. दरम्यान याचवेळी सुयश चैंधे याची पत्नी देखील चैंधे कुटुंबाविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे.