मोठी बातमी! राज्यातील जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांत, चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय जोरदार

शेतकऱ्यांना मोठा दिलासाImage Credit source: टीव्ही 9 मराठी

गावात भावकीत अथवा बांधावरून वाद काही नवा नाही. बांधावरून महाभारत हा गावकीच्या रहाटगाड्यातील रोजचाच प्रश्न आहे. त्यावरून कुरबुरी होतात. पार माराकुट्या होतात. प्रकरण प्रशासकीय दालनात गेल्यावर मग मोजणीचे भूत मानगुटीवर बसतं. मोजणीचा खर्च पाहून मग शेतकरी धास्तावतो. शिवाय जमिनीची खरेदी विक्री असू द्या अथवा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरची मोजणी प्रक्रिया असू द्या. त्यासाठीचे शुल्क अधिक, जादा असल्याचा सूर निघतोच. आता जमिनी मोजणी बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे.

अवघ्या 200 रुपयात मोजणी

केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शेतकर्‍यांवर आर्थिक भार पडू नये, हा यामागील उद्देश आहे.पूर्वी हिस्सेमोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपे प्रति हिस्सा आकारण्यात येत होते. हे शुल्क आता थेट 200 रुपयांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा मोजणी खर्च वाचणार आहे.

जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाईन

भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येते. पूर्वीसारख्या कार्यालयात खेटा मारण्याची गरज नाही. एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो. केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचा मोजणी खर्च वाचणार आहे.

तीन प्रकारे होते मोजणी

साधी मोजणी – साधी मोजणीला जास्त काळ लागतो. सहा महिन्यात ही मोजणी करण्यात येते. सरकार दरबारी त्यासाठी 1000 रुपये जमीन मोजणी शुल्क जमा करावे लागते.

जलद मोजणी – शेतकऱ्याला जर जमिनीची जलद मोजणी करायची असेल तर 2000 रुपये भरावे लागतात. तरीही या मोजणीसाठी तीन महिन्यांची प्रक्रिया आहे.

अतिजलद मोजणी – या मोजणीसाठी शेतकऱ्याला 3000 रुपये जमा करावे लागतात. जलद मोजणीसाठी तीन महिने तर अतिजलद मोजणीसाठी एक हजार रुपये अधिक द्यावे लागतात.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)