राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, समोर आलेल्या माहितीनुसार अखेर शिवेसना ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे. लवकरच या संदर्भात पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार आहे. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता होती, आता अखेर नाव समोर आलं आहे. भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा
दरम्यान विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपादासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव देखील आघाडीवर होतं. शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे. भास्कर जाधव हे एक आक्रमक नेते आहेत. त्यांचा अनुभव देखील मोठा आहे, महाविकास आघाडीचं प्रतिनिधत्व करताना ते आपले मुद्दे अधिक आक्रमकपणे सभागृहात मांडू शकतात.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीचे तीन प्रमुख पक्ष भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून तब्बल 232 जागा निवडून आल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला राज्यात केवळ 50 च जागा मिळाल्या. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार का? जर असेल तर कोणाला संधी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असून, सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे.