मोठी बातमी! माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता; अपहरणाची शक्यता

मोठी बातमी समोर येत आहे, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ऋषीराज सावंत  हे पुणे विमानतळावरून गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळाववरून गायब झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं होतं, त्यानंतर त्या ठिकाणाहून ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोनवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अपहरणाची शक्यता 

ऋषीराज सावंत  हे पुणे विमानतळावरून बेपत्ता आहे. त्यांचं अपहरण झालं असावं अशी   शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी ड्रायव्हरला विमानतळावर सोडायला लावलं त्यानंतर ते कोणालाही दिसले नाहीत. पुणे पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

पोलिसांचा दावा काय? 

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुण्यातून बेपत्ता आहेत. पुणे विमानतळावरून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. मुलगा बँकॉकला गेला आहे, त्यामुळे फोन बंद लागतोय, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे या प्रकरणात पोलीस यंत्रणेकडून माहिती घेत आहेत.

घटनेनं खळबळ 

दरम्यान या घटनेनं खळबळ उडाली आहे. ऋषीराज सावंत हे बेपत्ता आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे त्यांचं अपहरण झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ते बँकॉकला गेल्यानं फोन बंद लागतोय असा दावा पोलिसांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)