Vaishnavi Hagawane death case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे याची धाकटी सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं आहे. वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर आता वैष्णवीची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. वैष्णवी हिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. शिवाय वैष्णवी हिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी पोलिसांनी नवरा शशांक सासू लता आणि नणंद मयूरी, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक केली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
वैष्णवीच्या आई – वडिलांनी लेकीच्या सासरच्या मंडळींवर अनेक आरोप केले आहेत. लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, एक फॉर्च्यूनर कार आणि अन्य महागड्य वस्तू देखील मागितल्या होत्या. सर्व मागण्यापूर्ण केल्यानंतर देखील सासरच्या मंडळींकडून वैष्णवी हिला होणारा जाच सुरुच होता.
एवढंच नाही तर, एक धक्कादायक खुलासा देखील वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना VIP ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीचा नवरा, सासू आणि दीर यांना VIP ट्रिटमेंट मिळत असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
संबंधित प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, ऑगस्त 2023 मध्ये जेव्हा वैष्णवी गरोदर होती, तेव्हा नवरा शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. शिवाय शशांक याने वैष्णवी हिला मारहाण देखील केली होती. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या जाचाला कंटाळून वैष्णवी हिने विषारी औषध खात आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर, वैष्णवी बरी झाली आणि तिला तिच्या सासरच्या घरी पाठवण्यात आले, परंतु छळ थांबला नाही.
यानंतर शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडून जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने त्याने वैष्णवीला धमकावले आणि मारहाण केली. मार्च 2025 मध्ये, वैष्णवीला तिच्या सासू आणि वहिनीने जबर मारहाण केली.
त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने 16 मे 2025 मध्ये स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. अशात वैष्णवी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण पोलिसांनी वैष्णवी हिला मृत घोषित केलं. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.