ठाकरे ज्यांच्यासाठी काँग्रेसला भिडले, ते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर?

30 Apr 2025, 1:44 pm

ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांना जी काही ताकद लागेल ते देऊ असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं.चंद्रहार पाटील हे पैलवान असल्याने त्यांचीही स्वतःची ताकद आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले.चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटामध्ये वाव आहे आणि शिवसेनेची दारे उघडी आहेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले.चंद्रहार पाटलांनी शिवसेना शिंदे गटांसोबत येण्याचा निर्णय घेतला तर त्याचे स्वागतच असेल असं श्रीकांत शिंदे म्हणाले.डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे संकेत श्रीकांत शिंदेंनी दिले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)