Tan Removal Remedies: उन्हाळ्यात तुमच्या त्वचेवरील टॅनिंग घालवण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर….

tips and tricks lifestyle sun tanning removal in summer at home in marathiImage Credit source: tv9 marathi

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासह त्वचेची सुद्धा विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात सुर्यप्रकाशामुळे अनेकवेळा टॅनिंगच्या समस्या उद्भवतात. टॅनिंगमुळे तुमची त्वचा काळपट होते. उन्हाळा येताच, सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे त्वचा काळी आणि टॅन होते. तीव्र सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि त्वचेची काळजी न घेतल्यामुळे टॅनिंगची समस्या वाढू शकते. अनेकजण शरीरवरील टॅनिंग दूर करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करतात. पण घाबरू नका, तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी येथे काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत.

मार्केटमध्ये अशा अनेक क्रिम्स उपलब्द आहेत ज्यांच्या वापरामुळे टॅनिंग कमी होते असा दावा केला जातो. परंतु या क्रिम्सचा वापर केल्यास तुमच्या त्वचेला गंभीर परिणाम होऊ शकतात. त्वचेवर या क्रिम्सचा वापर केल्यास तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. परंतु आपल्या घरातील काही वस्तूंचा वापर केल्यास तुमच्या शरीरावरील टॅनिंग निघून जाते आणि तुमच्या त्वचेवर उलट परिणाम करत नाही. तसेच या वस्तूंच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमक येण्यास मदत होते.

लिंबू आणि मध – लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला उजळ करण्यास मदत करतात. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि ती मऊ करते. लिंबाचा रस आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा. या उपायामुळे टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत होईल.

दही आणि हळदीचा पॅक – दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा रंग सुधारतात. दही आणि हळदीची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. नियमित वापरामुळे तुम्हाला टॅनिंगपासून आराम मिळू शकतो.

बटाट्याचा रस – बटाट्याच्या रसात त्वचेला उजळवण्याचे गुणधर्म असतात आणि ते सनटॅन कमी करण्यास मदत करते. बटाट्याचा तुकडा कापून त्याचा रस काढा आणि बाधित भागांवर लावा. 15-20 मिनिटांनी धुवा. या उपायाने तुम्हाला त्वचेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होऊ शकते.

मुलतानी माती आणि गुलाबपाण्याचा पॅक – मुलतानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि गुलाबपाणी त्वचेला आराम देण्यास मदत करते. मुलतानी माती आणि गुलाबजल यांची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक धुवा. ही पद्धत त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

काकडी आणि टोमॅटोचे पॅक – काकडी आणि टोमॅटो दोन्ही त्वचेला थंड करण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. काकडी आणि टोमॅटोचा रस काढून तो प्रभावित भागांवर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि टॅनिंग कमी होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)