मखाना हे एक हेल्दी आणि चविष्ट स्नॅक्स आहे. तसेच मखाना हा असा एक ड्रायफ्रुट आहे जे लोकांना वेगवेगळ्या प्रकारे खायला आवडते. मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. मखानामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस, जस्त आणि फायबर भरपुर प्रमाणात आढळतात. म्हणूनच ते सुपरफूड मानले जाते.
मखाना खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, कोलेजन वाढते आणि पचन देखील निरोगी राहते. हेच कारण आहे की ते बहुतेक घरांमध्ये आढळते. खरंतर, मखानामध्ये लवकर खराब होत नाहीत. पण जर ते ओलाव्याच्या संपर्कात आले तर ते खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत मखाना योग्यरित्या साठवून ठेवणे अधिक महत्वाचे आहे. जेणेकरून ते बराच काळ ताजे राहू शकतील. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा मखाना बराच काळ खराब होण्यापासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात…
हवाबंद कंटेनरचा वापर करा
मखान्यांना आर्द्रतेपासून बचाव करण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे त्यांना हवाबंद डब्यात ठेवणे. मखाना नेहमी हवाबंद डब्यात (जसे की स्टील किंवा काचेच्या डब्यात) ठेवा. यामुळे ओलावा आणि हवा आत जाण्यापासून रोखली जाईल आणि मखाने कुरकुरीत राहतील.
उन्हात नीट वाळवा
जेव्हाही तुम्ही मखाने खरेदी कराल तेव्हा प्रथम ते काही वेळ उन्हात ठेवा. यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे मखान्यातील ओलावा निघून जाईल आणि ते बराच काळ ताजे आणि कुरकुरीत राहतील.
थंड आणि कोरड्या जागी साठवा
असे नाही की जर तुम्ही मखाना हवाबंद डब्यात ठेवले तर ते सुरक्षित राहतील. त्याऐवजी तुम्ही हे मखान्याचे कंटेनर थंड, कोरड्या ठिकाणी ठेवा.
मखाने थोडेसे भाजून देखील ठेवू शकता
मखाना साठवण्यापूर्वी तुम्ही ते हलके भाजून देखील घेऊ शकता. यामुळे दिर्घकाळ साठवून ठेऊ शकता. मखान्या भाजून घ्या त्यानंतर त्यांना थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते एका हवाबंद डब्यात ठेवा. ही पद्धत सर्वात जुनी आणि प्रभावी आहे.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने मखाना लवकर खराब होण्यापासून रोखण्यास देखील मदत करतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही मखाना साठवता तेव्हा डब्यात काही सुक्या कडुलिंबाची पाने ठेवा. यामुळे कीटकांचा प्रार्दुभाव रोखता येते आणि मखाने सुरक्षित राहतात.