कडक उन्हाळा सुरू झाल्याने सर्वांना उन्हाच्या झळा बसत आहे. त्यातच अनेकांना वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात होण्याची शक्यता असतते. त्यातच एप्रिल महिन्यातही काही ठिकाणी शाळा सुरु होतात आणि पुढच्या सेशनचे वर्ग सुरू होतात. अशा परिस्थितीमध्ये मुलांना शाळेत जाणे महत्त्वाचे आहे. म्हणून मुलांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी या कडक उन्हाळ्याच्या दिवसात आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तापमान वाढू लागल्याने घराबाहेर पडणे देखील कठीण होते. विशेषतः जेव्हा वातावरणात उन्हाचा कडाका वाढतो तेव्हा उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताची शक्यता वाढते.
अशा परिस्थितीत जेव्हा मुलं दुपारच्या शाळेतून परत घरी येतात आणि नंतर संध्याकाळी बाहेर खेळायला जातात. अशाने मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून, या उन्हाळ्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही या टिप्स अवलंबू शकता, जेणेकरून ते आजारांपासून दूर राहतील. तसेच उष्मघातापासुन मुलांचा बचाव होईल.
हायड्रेशन
उन्हाळा म्हटंल की आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होत असते. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्व वयोगटातील लोकांनी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, मुलांना जास्त पाणी पिण्यास सांगा जेणेकरून ते हायड्रेटेड आणि उत्साही राहतील. यामुळे उष्मघाताचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.
पालकांनी याची काळजी घ्यावी, जर मूल कमी पाणी पीत असेल तर त्यांना दिवसातून किमान २ लिटर पाणी पिण्यास द्यावे. याशिवाय, तुम्ही त्यांना नारळ पाणी, सफरचंदाचा ज्यूस आणि लिंबू पाणी पिण्यास देऊ शकता. टरबूज आणि काकडी यासारख्या अनेक गोष्टी शरीराला हायड्रेट करण्यास मदत करतात. त्यामुळे मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.
ॲक्टिव्ह राहण्यास प्रोत्साहित करा
तुमच्या मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी खेळण्यास प्रोत्साहित करू शकता. पण हे लक्षात ठेवा की जेव्हा हवामान योग्य असेल तेव्हाच मुलांना खेळण्यास सोडा. अशातच मुलांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाहेर कडक सूर्यप्रकाश असल्याने घरा बाहेर पाठवू नका. त्याऐवजी त्यांना संध्याकाळी 5 नंतर बाहेर खेळायला सोडा. पण या दिवसांमध्ये त्यांना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास भाग पाडा. जेणेकरून ते ॲक्टिव्हीटी दरम्यान तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतील.
हलके आणि सुती कपडे घाला
रगरगत्या उन्हात मुलांना हलक्या रंगाचे किंवा सुती कपडे घाला. कारण हे कापड घाम लवकर शोषून घेते. कधीकधी घाम येण्याचे कारण ॲलर्जी किंवा इतर काही समस्या असू शकते. म्हणून असे कपडे घाला जे घाम लवकर शोषून घेतात. याशिवाय असे कपडे शरीराला थंड करते. त्यातच घामामुळे शरीरावर पुरळ उठत नाही.
तुमच्या आहाराची काळजी घ्या
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर तळलेले किंवा जड अन्न खाणे टाळा. तसेच तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतील व शरीर हायड्रेटेड राहील. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. जर मुलं वारंवार आजारी पडत असेल किंवा अशक्तपणा, थकवा, अतिसार, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)