Posted inपुणे

कुठे खिडकीतून, तर कुठे कुलूप तोडून; पुण्यात अनेक ठिकाणी घरफोडी; साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी, पुणे : शहरात चार ठिकाणी घरफोडी झाली असून, चोरट्यांनी साडेचार लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाषाण येथील चैतन्य क्लासिक या इमारतीतील बंद सदनिकेची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा २ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी […]