Posted inपुणे

Pune News : पुणे विद्यापीठात शिकता येणार ‘ब्लॉकचेन टेक्नोलॉजी’, विद्यार्थ्यांना देणार हॅन्डस् ऑन ट्रेनिंग

प्रतिनिधी, पुणे : देशात आणि जगभरात ब्लॉकचेन टेक्नोलॉजीला वाढती मागणी आहे. या मागणीला लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बीएस्सी इन ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगजगताच्या मागणीनुसार आणि नविन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक सूचनांनुसार हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. […]