मुंबई: पावसाळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामामुळे इतस्ततः पडलेल्या विटा, रेती-सिमेंटच्या गोण्या झटपट उचलण्यात आल्या. तत्काळ साफसफाई करण्यात आली. वैद्यकीय नियोजनाच्या दृष्टीने खाटा लावण्यात आल्या. सलाइनचे स्टॅण्ड लागले, इतर वैद्यकीय सामुग्रीची उपलब्धता करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत एक वॉर्ड स्वच्छ व संसर्गरहित करून सज्ज करण्यात आला. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची बातमी कानी पडताच, दुर्घटनाग्रस्तांना इथेच दाखल केले […]