प्रतिनिधी, पुणे : प्रशांत महासागरात ‘ला निना’ विकसित होण्याचे स्पष्ट संकेत दिसत असल्याने जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. या आधी एप्रिलमधील अंदाजातही आयएमडीने सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रातही मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. हंगामाच्या विभागनिहाय अंदाजानुसार, यंदा महाराष्ट्रासह […]