प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील घडामोडींमुळे दहा वर्षांतील सर्वाधिक रखरखीत, तापदायक उन्हाचा एप्रिलमध्ये अनुभव घेतल्यानंतर पुण्यासाठी मे महिना उकाड्याने हैराण करणारा ठरला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काही दिवस सुसह्य झाले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढला होता. हवेतील आर्द्रतेमुळे उष्णतेची लाट नसतानाही पुणेकरांसाठी उकाडा असह्य ठरला. एप्रिलमध्ये […]