मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक ही पक्षफुटी, उमेदवारांची निवड अंतिम करताना राजकीय पक्षांची झालेली दमछाक आणि अनेक ठिकाणी उमेदवारांची आयात, परस्परांवर घणाघाती टोकाचा प्रचार व आरोप-प्रत्यारोप यामुळे चर्चेत राहिली आहे. त्यातच सोमवारी मतदानाच्या दिवशी आणखी एक भर पडली. मतदारांनी आपले मतदान गुप्त ठेवण्याचे संकेत असताना कित्येकांनी थेट सोशल मीडियावरच स्वत:चे मतदान प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उघड केल्याने ही […]